पुणे,
woman-secretly-filmed : पवनानगर, कामशेत परिसरातील 'मुकेश फॅन्सी कॉर्नर' या दुकानात कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे गुप्तपणे चित्रीकरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दुकानमालक मुकेश मुथा याच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
घटना 16 मार्चला सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडितेला कपडे बदलण्यासाठी स्टोअररूममध्ये पाठवण्यात आले, जिथे सीसीटीव्ही कॅमेरा असूनही आरोपीने तिचे चित्रीकरण केले. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने पीडितेचा विनयभंग केला आणि दमदाटीही केली.
कामशेत पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवून तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक लोसर या प्रकरणाचा तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार हे प्रभारी अधिकारी आहेत. आरोपी मुकेश मुथा याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असून पुढील कारवाई सुरू आहे.