अंबादेवी संस्थान तारापूरला ब दर्जा
बुलढाणा,
२०१८ पासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, Ambadevi Sansthan, Tarapur अंबादेवी संस्थान, तारापूर (ता. जि. बुलढाणा) यास शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत ’ब’ दर्जा मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जिआर जारी करण्यात आला आहे.
Ambadevi Sansthan, Tarapur मंत्रालयात अनेक वर्षे विविध प्रशासकीय त्रुटी, कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रियेमुळे हा प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र या सर्व त्रुटी दूर करून आ. संजय गायकवाड तसेच तारापूर येथील शिवसेना नेते प्रवीण जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर मंत्रालयात मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाली आणि सचिवांनी अधिकृत शासन निर्णय काढला. या निर्णयामुळे अंबादेवी संस्थानच्या विकासाला मोठा वेग मिळणार असून दरवर्षी सुमारे ५ कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होऊ शकतो. यातून यात्रास्थळाच्या पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयीसुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर विकासकामे करण्यात येणार आहेत. या यशस्वी पाठपुराव्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आ. संजय गायकवाड यांचे आभार व्यक्त केले असून, या निर्णयामुळे तारापूर आणि परिसराच्या धार्मिक व पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे