वाशीम
मिरवणूक ही केवळ उत्सवाची परंपरा नसून ती समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे या मिरवणुकीतून समता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा ठोस संदेश गेला पाहिजे, असे प्रतिपादन API Jitendra Adule एपीआय जितेंद्र अडुळे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्य ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भीमजयंती मिरवणूक मंडळ अध्यक्ष तथा भिम अनुयायी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र अडुळे, नापोकॉ अश्विन जाधव, पोकॉ ज्ञानेश्वर घुगे हें उपस्थित होते.
पुढे बोलतांना अडुळे म्हणाले की, महामानवांच्या विचारांचा गाभा हा समतेत आहे. जाती-पाती, भेदभाव आणि अन्याय यांना दूर सारत सर्वांनी एकत्र येणे, हीच खरी जयंती साजरी करण्याची योग्य पद्धत आहे. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी होणार्या प्रत्येक नागरिकाने शिस्त, संयम आणि जबाबदारीचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्थेबाबत कडक सूचनामिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.अफवांवर विश्वास ठेवू नकाभडकाऊ घोषणांपासून दूर रहा, शांततेत व अनुशासनात मिरवणूक पार पाडा असे आवाहनही त्यांनी केले.
API Jitendra Adule मिरवणुकीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार पोहोचवण्याची मोठी संधी असते. त्यामुळे केवळ ढोल-ताशा किंवा दिखाव्यापुरते न राहता, महामानवांच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक असल्याचे अडुळे यांनी स्पष्ट केले. हेच खरे अभिवादन महामानवांनी दिलेला समतेचा संदेश जनमानसात रुजवणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि एकजुटीने पुढे जाणे, हीच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे शेवटी अडुळे यांनी नमूद केले.