रुग्णालयाची आ. बाबुराव कदम यांच्याकडून पाहणी
हदगाव,
'Arogya Ratna' award, येथील उपजिल्हा रुग्णालयाला आमदार बाबुराव कदम यांनी भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. नुकतेच रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ तसेच ‘महाआरोग्य सन्मान 2026’ हे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाल्याच्या पृष्ठभूमीवर ही पाहणी विशेष महत्त्वाची ठरली. यावेळी आ. कदम यांनी रुग्णालयाच्या एकूण कार्याचा आढावा घेत विविध विभागातील कामकाज, रुग्णसेवेची गुणवत्ता व नागरिकांना दिल्या जाणाèया सुविधांची माहिती जाणून घेतली.
'Arogya Ratna' award, उपलब्ध सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या अडचणी व समस्यांवर चर्चा करून त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन केले. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, अधिसेविका, सहायक अधिसेविका, लिपिक वर्ग, तंत्रज्ञ वर्ग, औषध निर्माण अधिकारी, वाहन चालक, कक्षसेवक, सफाईगार, शिपाई तसेच इतर कर्मचाच्यां कार्याचे आमदारांनी कौतुक केले. हा सन्मान कायम ठेवत रुग्णसेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी नांदेड जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. दरबस्तरवार, डॉ. प्रदीप स्वामी, शिवसेना नेते भास्कर वानखेडे, रुग्णकल्याण समिती सदस्य राजेश तावडे, सुनील व्यवहारे, विशाल घोडेकर, आकाश डांगे, सलमान पठाण, नगरसेवक नामदेव वाकोडे व पांडुरंग जाधव, तुकाराम तवर, बबन कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.