बेंबळा सिंचन प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
काही कालवे व पाटसऱ्या  दुरुस्त करण्याची मागणी

मारेगाव, 
Bembal Irrigation Project मारेगाव तालुक्याला जीवनदायी असलेल्या बेंबळा प्रकल्पाचा तालुक्यातील उत्तर भागाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. या बेंबळा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहेत. परंतु प्रकल्पाचे काही ठिकाणी काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात बेंबळा प्रकल्पाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा या प्रकल्पाचे पाणी मारेगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत, वर्धा नदीकाठापर्यंत येऊन पोेचलेले आहे. बेंबळा सिंचन प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. या प्रकल्प कामामध्ये अजूनही काही ठिकाणी त्रुटी आहेत.
 
 
Bembla
 
Bembal Irrigation Project बेंबळा प्रकल्पाच्या कालव्यांचे काही ठिकाणी काँक्रिटीकरण झालेले नाही. ज्या ठिकाणी झालेले आहे तिथे पाणी साचून न राहता त्याला भेगा गेल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी लहान पाटसèया दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी या पाटसऱ्यांचा वापर केला जातो. परंतु या पाटसèयांद्वारे अनेक शेतकऱ्यांना पाणी पोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच लघुवितरिका व पाटसऱ्यांची अपूर्ण देखभाल, दुरुस्तीचा अभाव व स्थानिक पातळीवरील व्यवस्थापनातील त्रुटींमुळे अनेक क्षेत्रांपर्यंत पाटसरीतून पाणी पोेचण्यात अडचणी आहेत.
 
 
 
बेंबळा प्रकल्पामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढत आहे. अनेक ठिकाणी जमिनीत पाझर निर्माण होत आहे. परिसरातील विहिरी, विंधन विहिरी तसेच नदी नाल्यांमध्ये अनेक दिवस पाणी उपलब्ध राहत आहे. त्यामुळे शेतकरी सूक्ष्म सिंचन माध्यमातून रब्बी व उन्हाळी पिके घेत आहेत. दरम्यान प्रत्यक्ष सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या प्रकल्पांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाणी वापर संस्थांनीही या बेंबळा प्रकल्प विभागाला मदत करणे गरजेचे आहे. असे जर झाले तर या पाणीवापर संस्था शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचून पाणी देण्यासाठी सक्षमपणे मदत करू शकतील. परंतु विभागानेही ज्या ठिकाणी पाटसरींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी दुरुस्ती करून शेतकèयांच्या शेतीचे नुकसान होणार नाही, याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकèयांमधून होत आहे.