भाजप ४० स्टार प्रचारकांसह मैदानात

बारामती-राहुरी पोटनिवडणूक रंगणार

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
राहुरी,
BJP 40 star campaigners बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी स्थिती आता निश्चित झाली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती आणि राहुरीत अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, मात्र काही जण निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. परिणामी आजपासूनच प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बारामती व राहुरीमध्ये प्रचार करण्यासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे, जी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे.
 
 
 

bjp 
 
कोणाकोणाची आहेत नाव?
प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम शिंदे, ॲड. आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, उदयन राजे भोसले, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर, अशोक उईके, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. भागवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, धनंजय महाडिक, मायाताई इवनाते, भारती पवार, रामराव वडकुते, डॉ. सुजय विखे पाटील, योगश टिळेकर, अमित गोरखे, मोनिका राजळे, राहुल कुल आणि इद्रीस मुलतानी यांचा समावेश आहे.
 
 
राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. येथील सात उमेदवार रिंगणात उरले आहेत. सुरुवातीला ३० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु शेवटच्या दिवशी २३ जणांनी माघार घेतली. उरलेले उमेदवार म्हणजे अक्षय शिवाजी कर्डिले (भाजप), गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस), संतोष एकनाथ चोळके (वंचित बहुजन आघाडी), रावसाहेब सदाराम खेवरे, महेश केशव हापसे, सुरेश दत्तात्रय लांबे आणि अथर्व साहेबराव म्हसे (सर्व अपक्ष). बारामतीत सुनेत्रा पवार विरोधात निवडणूक लढवत आहेत. येथे एकूण ५५ उमेदवारांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज मागे घेतले. सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे होत आहे. राज्यातील या पोटनिवडणुकीत प्रचाराचे वातावरण तणावपूर्ण असून, बारामती आणि राहुरीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.