पंजाबमध्ये बीकेआयच्या सदस्यांना ग्रेनेड, शस्त्रांसह अटक

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
चंदिगढ,
BKI members arrested in Punjab पंजाबमध्ये दहशत पसरवण्याचा एक मोठा कट उघडकीस आला आहे. पंजाब पोलिसांनी परदेशी हँडलरच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या आयएसआय-प्रायोजित बीकेआय दहशतवादी टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच हँड ग्रेनेड, दोन विशेष डेटोनेटर्स, कोडर आणि डिकोडरसह एक पीटीटी टायमर, एक ९ व्होल्ट बॅटरी, आयईडी साहित्य, केबल आणि ट्रिगर मेकॅनिझमसह बाओफेंग वॉकी-टॉकी जप्त केली.
 
 

panjab 
जिल्हा अमृतसर ग्रामीण, जिल्हा गुरदासपूर आणि एसएसओसी-अमृतसर यांनी केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने सदर कारवाई पार पडली. गुरदासपूरमधील कलानौर पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. परदेशी सूत्रधार आणि स्थानिक साहाय्यक नेटवर्कचा तपास करून पुढील आणि मागील दुवे शोधण्यासाठी तपास सुरु आहे.