बिएलओच्या कामाला दांडी मारणार्‍या सहायक शिक्षकावर गुन्हा दाखल

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
गटशिक्षणाधिकारी कोकाटे यांची पोलिसांत तक्रार
 
रिसोड, 
Case registered against assistant teacher मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कामाला तालुयातील चाकोली जि.प. शाळेतील सहाय्यक शिक्षक शामसुंदर पल्लोड यांनी सतत दांडी मारल्याने गटशिक्षणाधिकारी बि. एल. कोकाटे यांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकांवर रिसोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
 
 
fir
 
Case registered against assistant teacher  निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महसुल प्रशासनाच्या निवडणूक विभागा अंतर्गत तालुयातील मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी बिएलओ म्हणुन चाकोली येथील जिल्हा परीषद शाळेचे सहाय्यक शिक्षक शामसुंदर पल्लोड यांनी नेमणुक २४ डिसेंबर २०२५ रोजी केली होती. सदर शिक्षकाने बिएलओ च्या कामाचे आदेश येण्याआधी २२ डिसेंबर २०२५ रोजी आजारी रजेचा अर्ज केल्याची माहीती बिएलओ पल्लोड यांनी दिली आहे. परंतु, गटशिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे यांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार निवडणूक याद्या अद्यावत करण्याच्या कामात कसुर करणे नियमानुसार अपराध ठरत आहे. तसेच सदर साहाय्यक शिक्षकाने निवडणूक कामामध्ये टाळाटाळ व हलगर्जी पणा केल्याचे दिसुन येत असल्याने सहाय्यक शिक्षक पल्लोड यांच्या विरुद्ध रिसोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.