चंद्रपुरात 800 मॅगेवॉटचा अती अद्ययावत संच येणार

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
 ‘अल्ट्रा सुपर क्रिटीकल’ असेल, तर तो राज्यात पहिला ठरेल
 सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता काथोये यांची माहिती

चंद्रपूर, 
Chandrapur Thermal Power Station चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात 800 मॅगेवॉटचा अद्ययावत संच येणार आहे. तो जर ‘अल्ट्रा सुपर क्रिटीकल’ वर्गातला असेल, तर राज्यातील पहिला अती अती अद्ययावत असा संच ठरेल, अशी माहिती सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता अनिल काथोये यांनी दिली. गुरूवार, 9 एप्रिल रोजी सायंकाळी सिएसटीपीएसच्या झेप सभागृहात पत्रकारांशी चर्चा करीत होते. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमित बनकर, राजुरकर आदी उपस्थित होते. काथोये पुढे म्हणाले, कोराडी येथे 800 मॅगेवॉटचा ‘सुपर क्रिटीकल’ संच उभारला गेला आहे. चंद्रपुरात त्याहीपेक्षा जास्त अद्ययावत असा ‘अल्ट्रा सुपर क्रिटीकल’ संचही येऊ शकतो. या संचाला तुलनात्मकद्दष्ट्या खुप कमी कोळसा लागता आणि त्यामुळे प्रदुषणही जवळजवळ होत नाही.
 
 
Kathoye
 
Chandrapur Thermal Power Station  संच क्रमांक 1 व 2 आधीच बंद करण्यात आले आहे. 3 आणि 4 क्रमांकाचे संचही जुने झाले असून, ते टप्प्याटप्याने बंद करायचे आहेत. मात्र, सध्या त्यांच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव आहे. जोवर नवीन संच लागत नाहीत, तोवर हे संच बंद करू नये, असा निर्णय महाजनकोने घेतला आहे. त्याचवेळी त्या संचांना शक्य तितके अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशीही माहिती काथोये यांनी दिली. सोलार उर्जेवरही आम्ही काम करीत आहोत. ईरई धरणावर तरंगणारे सोलार प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, तो खुप खर्चिक असल्याने सध्या तो प्रलंबित आहे. तसेही राज्याच्या औष्णिक वीज निर्मितीत सुमारे 33 टक्के वाटा असणारे चंद्रपूर केंद्राचा आहे. सध्या आमच्याकडे सुमारे 50 लाख मेट्रिक टन कोळश्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी ईएसपी प्रणाली कार्यान्वित आहे. याशिवाय, इरई धरणातून महापालिकेला अतिरिक्त पाणी देऊन शहराचे सांडपाणी प्रक्रिया करून आम्ही वापरत आहोत.
विजेची मागणी वाढली
सध्या विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दिवसा सौर ऊर्जा उपलब्ध असल्याने भार तुलनेने कमी असतो. मात्र, रात्री मागणी वाढते. सिएसटीपीएसमधून सध्या एकूण 2262 मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे.