प्रगतीशील शेतकर्यांशी संवाद व प्रशिक्षण कार्यक्रम
वर्धा,
शासनामार्फत केळी, फुले व भाजीपाला विक्रीकरिता मार्केट जोडणी, फळे भाजीपाला लागवड तांत्रिक मार्गदर्शन व रेशीम शेती व्यवसाय लस्टर विकसित करण्यासाठी व्यवसायाकरिता पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन Collector Vanmathi C. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिले.
पवनार येथील हिवरे सभागृहात प्रगतीशील शेतकर्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट लागवड, मसाले पीक लागवड, फुल शेती लागवड, मशरुम व रेशीम शेती व्यवसायावर आधारीत संवाद व प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी रजनी बनसोड, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, मंडळ कृषी अधिकारी एस. एस. मुडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व युवा प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते. सिट्रस इस्टेट तळेगाव, आष्टीमार्फत इंडो इस्त्रायल पद्धतीने संत्रा व मोसंबी लागवडसाठी शेतकर्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले.
Collector Vanmathi C. मिरची, हळद, अद्रक या मसाला पिकांचे लस्टर पद्धतीने नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यास मदत होईल. कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत ४० टक्के अनुदान देण्यात येईल, असे सांगण्यात आले. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते, असे अरविंद उपरीकर म्हणाले. रजनी बनसोड यांनी देशी रेशीम किटक संगोपन, चाकी टप्पा कोष निर्मिती प्रक्रिया व रेशीम बाजारपेठ याविषयी मार्गदर्शन केले. शेती तज्ज्ञ शेतकरी प्रवीण बाकडे यांनी मशरुम लागवडी विषयी माहिती दिली.