हॉटेल व्यवसायींची मागणी
व्यावसायिक गॅसअभावी उपासमारी
झरी,
Commercial gas cylinder झरी येथील हॉटेल व्यवसायींना व्यवसायिक गॅस मिळत नसल्याने त्यांचे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदार अक्षय रासने यांच्याकडे निवेदनातून केली आहे. झरी येथील मुख्य चौकामध्ये लहान मोठे चहा टपरी व हॉटेल व्यवसायी आहेत. व्यवसायींचा उदरनिर्वाह त्यांच्या व्यवसायावर असून संबंधित व्यवसायींना सिलेंडर गॅस मिळत नसल्याने त्यांना आपापली दुकान बंद ठेवावी लागत आहेत.
युद्धाचा परिणाम सगळीकडेच असून झरीच्या गॅस एजन्सीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध आहे. मात्र व्यवसायींना गॅस देण्याकरिता तहसीलदारांचा आदेश गॅस एजन्सीला प्राप्त झाला नसल्याने गॅस एजन्सीकडून व्यवसायींना गॅस सिलेंडर देणे बंद केले आहे. येथील लहान मोठे व्यापारी नगर पंचायतच्या संकुलात व्यवसाय करीत आहेत. मात्र गॅस सिलेंडर अभावी व्यवसाय होत नसल्याने नगरपंचायतला भाडे कसे द्यायचे असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. तेव्हा गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी झरी येथील व्यवसायिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Commercial gas cylinder यावेळी झरी येतील व्यवसायी राजू दडांजे, राजीव गुरनुले, सुभाष राऊत, प्रतीक जयस्वाल, आसिफ कुरेशी, अमजद खान, सतीश पुनवटकर, शेखर नारायणे, दीपक त्रिवेदी, माजीसा बिकानेर, दीपक पांडे, सत्यनारायण पांडे, प्रभाकर मडावी, दत्ता चौधरी, सचिन आत्राम, पुरुषोत्तम वेळा, संतोष सोयाम व इतर व्यवसायी उपस्थित होते.