मुख्यमंत्री हिमांता बिस्वा यांच्या वक्तव्याचा निषेध

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
देवडिया काँग्रेस भवन येथे आंदोलन
 
नागपूर,
Congress movement आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्या घृणास्पद, लाजिरवाणे व संपूर्ण दलित समाजाच्या स्वाभिमानावर थेट हल्ला करणारे आहे. या निर्लज्ज वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने देवडिया काँग्रेस भवन येथे आंदोलन करण्यात आले.
 
 
congress-andolan
 
Congress movement  आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे व सह प्रभारी नवज्योत सिंग संधू यांनी केले. यावेळी नागपूर झोन अध्यक्ष कपिल ढोके, उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, नागपूर प्रभारी रितेश पांडव, महासचिव अक्षय हेटे, रौनक चौधरी, आकाश गुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होय. विरोधकांचा आवाज दडपण्याचे षडयंत्र सुरु गंभीर आरोप युवक काँग्रेसने केला.