Construction encroachment in Mama Lake तालुक्यातील वैरागड येथील गावालगत असलेल्या आरक बोडी म्हणून ओळखल्या जाणार्या मामा तलावाच्या अंतर्गत भागात सेवा सहकारी संस्था वैरागड यांनी नियमबाह्य अतिक्रमण करून गोदामाच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. नैसर्गिक स्त्रोतांच्या ठिकाणी आणि मामा तलावात अतिक्रमण हे नैसर्गिक स्त्रोतांना हानी पोहोचवणारी आहे. त्यामुळे गोदामाचे बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वैरागड हद्दीत सर्वे नंबर 143।2 मध्ये 3.03 सरासरी क्षेत्रफळ हेक्टर क्षेत्रात आरकबोडी क्षेत्र असून याच्या बाजूला ठाकरे यांची जागा तर दुसर्या बाजूला पशुवैद्यकीय दवाखाना असून अनुसूचित जमातीतील व इतर पारंपारिक वननिवास वन हक्काची मान्यता म्हणून कांताबाई कुडशेगे व फार पूर्वीपासून या जागेवर अधिवास असलेल्या इतर दोन कुटुंबियांना 0.05 क्षेत्र जागा वाटप असल्याची नोंद महसुली दप्तरी असल्याची माहिती आहे. तेवढीच जागा सेवा सहकारी संस्थेला देण्यात आली होती. त्या निर्धारित जागेवर सध्या संस्थेचे कार्यालय उभे आहे आणि आता जो भाग तलावाच्या हद्दीत होता, त्या जागेवर संस्थेच्या कार्यालयाच्या मागच्या बाजूला तलावात नियमबाह्य अतिक्रमण करून गोदामाचे बांधकाम चालू आहे.
Construction encroachment in Mama Lake आरकबोडी तलाव दरवर्षी ग्रामपंचायतकडून लिलाव काढून लीजतत्त्वावर येथील मच्छी पालन सहकारी संस्थेला मासेमारीसाठी देण्यात येतो. सध्यास्थितीत जिल्ह्यातील मामा तलावाचे सर्वाधिकार जिप सिंचाई विभागाकडे असून शासनाची कोणतीच परवानगी न घेता नैसर्गिक स्त्रोताच्या ठिकाणी अतिक्रमण करुन हानी पोहोचवणार्या संबंधितावर कारवाई करण्याचे महाराष्ट्र अधिनियमात उल्लेख आहे. संस्थेनी संबंधित विभागाची कोणतीच पूर्वपरवानगी न घेता गोदामाचे काम करीत असून व नैसर्गिक स्त्रोतांचा झपाट्याने होणारा र्हास व भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता तलाव, बोड्या व नाल्यांचे नुकसान करणार्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असून अशा अतिक्रमणावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.