नवी दिल्ली,
Cyclone Milea in the Pacific Ocean जगभरात पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या घातक चक्रीवादळामुळे तणाव वाढला आहे. सोलोमन समुद्रातील या चक्रीवादळाचे वेगमान १९५ किलोमीटर प्रती तास इतके आहे. भारतीय हवामान विभागानुसार, मैला चक्रीवादळ भारतापासून हजारो किलोमीटर दूर आहे. त्यामुळे देशातील किनाऱ्यांना थेट धोका नाही. तरीही दक्षिण भारतात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वारे, पाऊस आणि विजांचा कडकडाट जाणवेल, तसेच उष्णतेची लाटही निर्माण होऊ शकते.
हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी यांच्या दरम्यान पॅसिफिक महासागरात सक्रिय आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, हे श्रेणी ३ किंवा ४ चे घातक चक्रीवादळ मानले जाते. या वादळाच्या आसपास वाऱ्याचा वेग १९५ किलोमीटर प्रती तास आहे. भारतापासून हे वादळ दूर असल्यामुळे सागरी किनाऱ्यांना थेट धोका नाही.भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पुढील काही दिवसांत कोणतेही चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता नाही. तथापि, स्थानिक हवामान प्रणाली सक्रिय असल्याने काही भागांमध्ये बदल होऊ शकतो.