दिल्ली स्फोटातील आरोपींना न्यायालयीन कोठडी

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
श्रीनगर,
Delhi blast case राजधानी दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने 10 दिवसांनी, म्हणजेच 20 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
 

दिल्ली स्फोटातील आरोपींना न्यायालयीन कोठडी 
एनआयए विशेष न्यायालयात (श्रीनगर) अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनजीत राय यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आरोपींमध्ये जमीर अहमद अहंगर (गांदरबल), मौलवी इरफान अहमद वागे (शोपियान), डॉ. मुजम्मिल शकील गनी (पुलवामा), डॉ. आदिल अहमद राथर (काझीगुंड) आणि शाहीन सईद (लखनौ/फरीदाबाद) यांचा समावेश आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. न्यायालयाने नमूद केले की, आरोप गंभीर असून, बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित आरोपी देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला Delhi blast case धोका निर्माण करतात. त्यामुळे, आरोपींना कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. तुरुंग प्रशासनाला आरोपींची नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.