नाशिक आयटी कंपनीची सखोल चौकशी होणार

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
बीड,
Devendra Fadnavis' assurance नाशिकमधील प्रकरणात बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकणे असे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आयटी कंपनीत अशा प्रकारची घटना घडणे धक्कादायक आहे आणि सखोल चौकशी केली जाईल. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर पार पडत असलेल्या 94 व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी नाशिकमधील आयटी कंपनीतील घटनेबाबतही भाष्य केले. ती गंभीर असल्याचे सांगत सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले.
 
Devendra Fadnavis
 
गहिनीनाथ गडावरी नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमासाठी मला एक वर्षापूर्वी निमंत्रण मिळाले होते आणि मी पदामुळे नव्हे तर भक्त म्हणून येथे आलो आहे. विविध गावांनी 2039 पर्यंतचे नारळ बुकिंग केले आहेत, ही पाहण्यासारखी घटना आहे. विविध समाजाचे लोक एकत्र येतात, आध्यात्मिक बैठक होते आणि समाज सशक्त बनतो. वारकरी परंपरेत शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, पंढरीकडे जाणारी दिंडी आणि गडावरी व्यवस्था या परंपरेत सतत राखली जाते.कार्यक्रमात काही भाविकांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याची मागणी केली, तर काहींनी गडावरून पंढरपूरला जाणाऱ्या व्यवस्थेसाठी विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागण्यांकडे लक्ष दिले असून, भावनिक आठवणींना उजाळा देत गोपीनाथ मुंडेसाहेबांसह शेवटचा फोटो मिळाल्याचे सांगितले.