ढोमणे ज्वेलर्सला मुंबईत प्रतिष्ठेचा पुरस्कार

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
Dhomane Jewellers तीन पिढ्यांपासून सुवर्ण परंपरा जपणारे, आभूषण क्षेत्रात उत्कृष्टता, विश्वास आणि गुणवत्तेची भकम ओळख निर्माण करणारे मनोहर तुकारामजी ढोमणे (एमटीडी) ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडला ‘प्रिफेअर्ड रिटेलर ऑफ इंडिया’ हा प्रतिष्ठीत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. देशभरातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रॅण्ड्स आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात हा गौरव प्रदान करण्यात आला.
 
 
mtd
 
Dhomane Jewellers  हा सन्मान म्हणजे ग्राहकांसोबत वर्षानुवर्षे जपलेल्या विश्वास, पारदर्शकता आणि उत्कृष्ट सेवेचे फलित आहे. एमटीडी ढोमणे ज्वेलर्स यांनी नेहमीच उच्चप्रतीचे आभूषण, आकर्षक डिझाइन्स आणि विश्वासार्ह खरेदी अनुभव देण्यावर भर दिला आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत, बदलत्या काळानुसार आपल्या उत्पादन आणि सेवांमध्ये सातत्याने नाविण्यपूर्णत: आणण्याचे काम एमटीडी ढोमणे ज्वेलर्स यांनी केले आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि भावनांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक आभूषणात उत्कृष्टतेची झलक देण्याची त्यांची बांधिलकीच त्यांना वेगळी ओळख मिळवून देते. यावेळी एमटीडी ढोमणे ज्वेलर्सच्या संबंधित प्रतिनिधींनी सांगितले की, हा सन्मान केवळ एमटीडी ढोमणे ज्वेलर्ससाठीच नव्हे तर संपूर्ण आभूषण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.