‘धुरंधर 2’ने ‘दंगलचा रेकॉर्ड मोडला

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
मुंबई ,

Dhurandhar 2 धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे . 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने फक्त तीन आठवड्यातच जगभरात 1600 कोटी रुपयांची कमाई करून बॉलिवूडच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे
 

Dhurandhar 2 box office, Dhurandhar 2 record-breaking collection, 
‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर एक महत्त्वाचा विक्रम मोडला आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या दंगल चित्रपटाने तेव्हापासून वर्ल्डवाइड 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान टिकवले होते. परंतु सर्वात जलद गतीने 1600 कोटी रुपये कमावण्याचा विक्रम आता ‘धुरंधर 2’ने आपल्या नावावर केला आहे. ‘दंगल’ला हा आकडा गाठण्यासाठी 25 दिवस लागले होते, तर प्रभासच्या मुख्य भूमिकेतल्या बाहुबली 2 ने 28 दिवसात हे साधले होते. मात्र रणवीरच्या या चित्रपटाने अवघ्या 18 दिवसांत हा इतिहास रचला आहे.‘‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर 102 कोटी रुपयांच्या दमदार ओपनिंगसह सुरुवात केली. सध्या या चित्रपटाने 1013.77 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.