विविध योजनेतील लाभार्थ्यांना लाभ वितरित
यवतमाळ,
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन बुधवार, 8 एप्रिल रोजी करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य प्राजक्ता इंगळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल नगराळे, तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी ज्योत्स्ना तिजारे उपस्थित होत्या. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी सामाजिक समता सप्ताहाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान विविध योजनांंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत गौरव खेकचंद बडोले, दीपक सिद्धार्थ गजभिये, ऐश्वर्या प्रमोद चालखुरे, यश गंगाधर गजभिये व भारत सरकार मॅट्रिकनंतरच्या परराज्य शिष्यवृत्ती योजनेंतर्गत उज्ज्वला छत्रपती बनसोड, श्रेया श्याम नगराळे, निलेश सुनील बरडे तसेच छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेंतर्गत श्वेता राजेंद्र बन्सोड व प्रेरणा दीपक सावळे यांना लाभ देण्यात आला. या सप्ताहातील सर्व कार्यक्रम 8 ते 14 एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रोज सकाळी 11 ते दुपारी 2 आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी समाज कल्याण निरीक्षक अश्विनी राऊत व त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले. संचालन समतादूत रोरूश वानखेडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन ज्योत्स्ना तिजारे यांनी केले.