राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १६ रोजी वर्धेत; स्वागताची तयारी जोरात

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
Droupadi Murmu, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. आज गुरुवार ९ रोजी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी हिंदी विश्व विद्यापीठ परिसराला भेट देऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी कुलगुरू कुमुद शर्मा यांची उपस्थिती होती.
 

Droupadi Murmu,  
 
 
विश्वविद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ गुरुवार १६ रोजी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी टागोर सांस्कृतिक संकुलातील निराला प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती तसेच विश्व विद्यापीठाच्या कुलाध्यक्ष द्रौपदी मुर्मू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षण राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, कार्य परिषदेचे सदस्य प्रा. सुरेंद्र दुबे उपस्थित राहतील. कार्यक्रमात विश्वविद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा दीक्षांत उपदेश देतील.
 
विश्वविद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती येत आहेत. या प्रसंगी विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तसेच इतर सन्मान व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन २००७ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भेट देऊन दूर शिक्षा निदेशालयाचे उद्घाटन केले होते. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विश्वविद्यालयात जोरदार तयारी सुरू असून जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची आवश्यक तयारी केली जात आहे.
 
 
दीक्षांत समारंभ यशस्वीपणे पार Droupadi Murmu पाडण्यासाठी विश्वविद्यालयाने विविध समित्या स्थापन केल्या असून त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी समन्वय समिती, स्वागत समिती, पदवी व प्रमाणपत्र वितरण समिती, माध्यम समिती तसेच वाहतूक व इतर समित्यांसोबत बैठक घेऊन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्म सेवाग्राम येथील गांधी आश्रमलाही भेट देणार असल्याची माहिती आहे.