चीनपासून वेगळे झाल्यानंतर पूर्व तुर्कस्तान बनेल एक नवीन देश?

स्वातंत्र्याची मागणी पुन्हा तीव्र

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
बीजिंग,
east-turkestan : चीनमधील शिनजियांग (पूर्व तुर्किस्तान) प्रदेशात स्वातंत्र्याच्या मागणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूर्व तुर्किस्तान नॅशनल मूव्हमेंटसह विविध संघटनांनी चीनपासून वेगळे राष्ट्र निर्माण करण्याची मागणी नव्याने पुढे आणली असून, त्यांनी ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून दिली आहे.
 

CHINA 
 
 
या संघटनांचा आरोप आहे की चीनने १९४९ पासून या प्रदेशावर नियंत्रण मिळवल्यानंतर उइगर आणि इतर तुर्किक समुदायांवर दडपशाही, सांस्कृतिक हस्तक्षेप आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे.
 
दुसरीकडे, चीन सरकार या सर्व आरोपांना फेटाळत असून शिनजियांग हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे ठामपणे सांगते आणि अशा स्वातंत्र्याच्या मागण्यांना विभाजनवाद मानते.
 
सध्या या मुद्द्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा वाढली असून, उइगर समुदायाशी संबंधित मानवी हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.