देवळीत अतिक्रमणावर चालला गजराज

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
छोट्या दुकानदारांचे संसार संकटात
 
देवळी, 
Encroachment removal campaign Deoli जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार देवळी नगरपरिषदेच्या वतीने आज गुरुवार ९ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे अनेक छोटे व्यावसायिक व हातगाडीधारकांचा रोजगार धोयात आला आहे.
 
 
deoli
 
मुख्याधिकारी नेहा आकोडे यांच्या नेतृत्वात झालेल्या मोहिमेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून करण्यात आली. नगरपरिषद गेटसमोरील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर आठवडी बाजार चौक ते पोस्ट ऑफिस मार्ग तसेच नवदुर्गा मंदिराजवळ मागील सुमारे ४० वर्षांपासून असलेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. मात्र, याच परिसरातील काही व्यावसायिकांचे टीनचे ठेले व एका पया दुकानासमोरील रस्त्यावर आलेले टीनाचे शेड न काढल्याने प्रशासनावर भेदभाव केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
 
 
Encroachment removal campaign Deoli या मोहिमेत आठवडी बाजार ते पोस्ट ऑफिस, इंदिरा गांधी पुतळा ते बसस्थानक, गांधी चौक, मस्जिद चौक, ठाकरे चौक, आचार्य चौक तसेच लेंडी नाला चौक या भागांतील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी वंदना कारखेडे, देवळीचे ठाणेदार अमोल मंडलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभिये व पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुख्याधिकारी नेहा आकोडे यांच्या मार्गदर्शनात उपमुख्याधिकारी समीक्षा गुरदे, पल्लवी इंगोले, सुनील ताकसांडे, गजानन खोंड, सुनील खोंड यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी पाहिल