दोन कृषी परवानाधारक दुकानदारांना खत विक्री बंदीचा आदेश

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
कुरखेडा, 
रब्बी हंगामात कुरखेडा तालुक्यात Fertilizer Sale Case खत विक्रीत काळाबाजार होत असल्याची खमंग चर्चा चालू असतानाच गडचिरोलीचे कृषी अधिकारी व कुरखेडा येथील तालुका गुण नियंत्रक अधिकारी यांच्या भरारी पथकाने कृषी परवानाधारक दुकानांची तपासणी केली असता खत विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी केंद्र व सोनकुसरे कृषी केंद्र कुरखेडा या दोन परवानाधारक कृषी केंद्र धारकांना खत विक्री बंदीचा आदेश दिला आहे.
 
 
Shopkeeper
 
रब्बी हंगामात धान्य व मका पीक उत्पादक शेतकर्‍यांना युरियासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत होती. अशातच बर्‍याच शेतकर्‍यांना एक ते दोन बॅग युरियावर समाधान मानावे लागत होते. परंतु आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना 20 युरिया बॅग दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला उपाशी, तर कुणाला तुपाशी असा भेदभाव कृषी केंद्रचालक करीत असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती. अशातच कुरखेडा तालुक्यात कृषी परवानाधारक यांची तालुका गुण नियंत्रक निरीक्षक तथा कृषी अधिकारी गडचिरोली येथील तपासणी भरारी पथकाने तपासणी केली असता महाराष्ट्र कृषी केंद्र व सोनकुसरे ऍग्रो एजन्सी कुरखेडा यांनी केलेल्या विक्रीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली असून एकाच शेतकर्‍यास जास्त दराने युरिया बॅग देणे, इ-पास व प्रत्यक्षात साठा न जुडणे, नियमित विक्री अहवाल सादर न करणे व युरिया खतात तफावत आढळून आल्याने एकूण 32.715 टन खतास विक्री बंद आदेश देण्यात आले आहे.
 
 
Fertilizer Sale Case  कृषी परवानाधारकांनी नियमित अहवाल सादर करावा, एकाच शेतकर्‍यास जास्त बॅग विक्री करू नये तसेच प्रत्यक्षात साठा व ईपास वरील साठा याचा ताळमेळ ठेवावा, जादा दराने खत विक्री करू नये, खताची लिंकिंग करू नये अशी ताकीद गुण नियंत्रक निरीक्षक संजय रामटेके यांनी सर्व परवानाधारक दुकानदारांना दिलेली आहे. महाराष्ट्र कृषी केंद्र व सोनकुसरे कृषी केंद्र कुरखेडा यांना खत विक्री बंद आदेश दिल्याने परवानाधारक कृषी केंद्र संचालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.