गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सीवर ‘वॉच’

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, 
Gas black market जिल्ह्यात काही ठिकाणी गॅसची टंचाई झाली आहे. मात्र, आपल्याकडे गॅसचा साठा उपलब्ध आहे. तरी देखील काही गॅस एजन्सीकडून काळाबाजार होत असेल तर अशा एजन्सीवर वॉच राहणार आहे. त्यांच्यावर फौजदारी किंवा त्या एजन्सीचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गुरुवार, 9 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
 
 
VIKAS
 
पुढे बोलताना विकास मीना म्हणाले, जिल्ह्यात एचपीसीएलचे 16 वितरक आहेत. त्याचबरोबर बीपीसीएलचे 8, एलओसीएलचे 23 असे एकूण 47 वितरक आहेत. यांच्यामार्फत गॅसचे वितरण होत आहे. तरीदेखील काही ठिकाणी गॅससाठी नागरिक गर्दी करत आहेत. गॅसचा पुरेसा साठा असूनसुद्धा नागरिकांना त्रास होत असेल तर कुठे गॅसचा काळाबाजार होत आहे, का याची तपासणी करण्यात येईल. कोणत्या एजन्सीबाबत तक्रार प्राप्त झाली व त्यात तथ्य आढळल्यास त्या एजन्सीवर कठोर कारवाई केल्या जाणार आहे. आज एचपीसीएलचा सिलेंडर साठा 4764 आहे. त्याचबरोबर बीपीसीएल 2205, एलओसीएल 5484 एवढा साठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली.

जिल्ह्यात होणार युवासंवाद
Gas black market  जिल्ह्यातील धडपडणाऱ्या, स्वप्न पाहणाèया तरुणांसोबत संवाद साधण्यात येणार आहे. बचत भवन येथे मंगळवार, 21 एप्रिलपासून सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत ‘युवा संवाद’चे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ, पुसद, वणी या तीन ठिकाणी हा संवाद कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात एमपीएससी तसेच इतर परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.