ज्येष्ठ अभिनेते गिरीश यांची 'दीपज्योती' मध्ये एंट्री

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Girish Oak आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक लवकरच नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लाखात एक आमचा दादा या मालिकेत खलनायकाची भूमिका गाजवल्यानंतर ते आता दीपज्योती या नव्या मालिकेतून एक सकारात्मक आणि सुसंस्कृत व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
 

Girish Oak 
या भूमिकेबद्दल बोलताना गिरीश ओक यांनी सांगितले की, ‘दीपज्योती’साठी त्यांची निवड आधीच निश्चित झाल्याची त्यांना जाणीव झाली होती. मुंबईतील एका कार्यक्रमात प्रोग्रामिंग हेड यांनी त्यांच्याशी संपर्क साधून या मालिकेची माहिती दिली होती. त्यानंतर रीडिंग आणि लुक टेस्ट झाले असले तरी त्यांची निवड जवळपास निश्चित होती.‘दीपज्योती’मध्ये गिरीश ओक ‘पुरुषोत्तम गायकवाड’ ही भूमिका साकारत असून, ही व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनय प्रवासात एक वेगळा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या मालिकेत Girish Oak  त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा अत्यंत नकारात्मक होती. निर्दयी, शोषण करणारा, कुटुंबीयांशी वाईट वागणारा असा खलनायक त्यांनी प्रभावीपणे उभा केला होता. मात्र ‘दीपज्योती’मधील पुरुषोत्तम ही भूमिका त्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. प्रामाणिक, सरळमार्गी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मिळाल्याने ते उत्साहित असल्याचे त्यांनी सांगितले.मालिकेच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. लोक प्रत्यक्ष भेटून मालिकेबद्दल विचारणा करत असून त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.