गुरुवारी सोने-चांदीच्या दरात घसरण

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
सोने ४०० रुपये तर चांदी ३,७०० रुपयांची घसरण

नागपूर,
gold and silver prices अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताच सोने -चांदीच्या वाढ झाली होती. मात्र गुरुवारी पुन्हा दर कमी झाले. गत ३८ दिवसांपासून सुरु असलेले इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युध्दामुळे सराफा बाजारात चिंतेचे वातावरण होते. गुरुवार, ९ एप्रिल रोजी भारतातील सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा दर (१० ग्रॅम) अंदाजे १,५२,२०० रु. आला आहे, तर चांदी (१ २,४२,७०० रुपयांच्या आसपास आहे, अशा प्रकारे सोने-चांदीच्या किमतीत ३ ते ४ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून येत आहे.
 
 
gold
gold and silver prices  नागपूरच्या सराफा बाजारात मंगळवारी १ लाख ४९ हजार रुपये प्रति १० ग्रॅम असलेले सोने बुधवारी १ लाख ५२ हजार ६०० रुपयांवर पोहोचले. सोन्यात तब्बल ३ हजार ६०० रुपयांची वाढ तर चांदीच्या दराने उसळी घेतली होती. मंगळवारी २ लाख ३५ हजार ५०० रुपये किलो असलेली चांदी बुधवारी २ लाख ४६ हजार ४०० रुपयांवर गेली. चांदीत एका दिवसात १० हजार ९०० रुपयांची वाढ झाली होती. लग्न सराईच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत झाले आहे.
 
 
सोन्याचा भाव १.८२ लाखावर जाणार?
सध्याची परिस्थितीत दर नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे युद्धविराम झाला, तर नागपुरात सोन्याचे भाव जीएसटीशिवाय आधीप्रमाणे १.८२ लाख रुपये प्रतिदहा ग्रॅम पोहोचू शकतात,असा अंदाज ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कॉन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केला आहे.