नागपूर,
Golwalkar Hall, Madhavnagar महिला प्रबोधन मंडळ, नागपूर यांच्या वतीने माधवनगर येथील गोळवलकर सभागृहात वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “कुटुंब व्यवस्था विस्कळीत होण्यास तरुण पिढीचे आभासी माध्यमाच्या आहारी जाणे जबाबदार आहे” हा विषय ठेवण्यात आला होता.
स्पर्धेत २० स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश मीरा खड्ककार होत्या, तर परीक्षक म्हणून माधुरी वाघ व छाया नाईक यांनी काम पाहिले. Golwalkar Hall, Madhavnagar स्पर्धेत प्रथम क्रमांक शिल्पा नंदन पवार, द्वितीय आशा लांजेवार, तृतीय सीमा थत्ते तर उत्तेजनार्थ रश्मी देवघरे व नंदिनी भोजराज यांना पुरस्कार मिळाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती आकांत यांनी केले. आयोजनात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.
सौजन्य: मृदुला पंडित,संपर्क मित्र