सौर ऊर्जा ही विकासाची पंचसूत्री कायम दृष्टीपथात ठेवण्याचे आवाहन

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- मूलभूत विकास कामांची पंचसूत्री
- पट्टेवाटपाचा अधिकार आता उपविभागीय अधिकार्‍यांना
 
नागपूर, 
Guardian Minister Chandrashekhar Bawankule वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवासुविधा उत्तम प्रकारे पोहचविण्याची जबाबदारी नगरपरिषद व पालिका प्रशासनावर आहे. गावाचा नागरिक म्हणून जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मूलभूत गरजांपैकी असलेल्या उद्दिष्टांवर नगराध्यक्षांनी प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे. यात पाणी पुरवठा व सुधारणा, आवश्यकता भासेल तिथे लघु योजना, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वयंपूर्ण दिवाबत्ती अर्थात सौर ऊर्जा ही विकासाची पंचसूत्री नगराध्यक्षांनी कायम दृष्टीपथात ठेवण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर यांनी केले.
 
 
bawankule-one
 
नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व शासनाच्या विविध योजनांतर्गत पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता, आरोग्य, धापेवाडा देवस्थान विकास व इतर विषयांवरील नियोजन भवन येथील बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्ह्यातील नवनियुक्त नगराध्यक्ष अजय अग्रवाल, अर्चना देशमुख, नरेश चरडे, गौतम, प्रसन्ना तिडके, मनोजभाऊ कोरडे, बिकेंद्र महाजन, राजेंद्र शेंद्रे, किर्तीताई बडोले, योगेश चाफले, संजना मंगळे व इतर नगराध्यक्ष, उपवनसंरक्षक डॉ विनिता व्यास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, जिल्हा सहआयुक्त विनोद जाधव उपस्थित होते.
 
 
पट्टेवाटपाचा अधिकार आता उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. आपल्या नगरपालिका क्षेत्रात जर पट्टेवाटप शिल्लक तर यासाठी पुढाकार घ्या. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या मालकीचे घर या पट्टेवाटप योजनेतून साकारले जाईल. प्रत्येकाला आपल्या घराची आपल्या नावावर असलेली सनद मिळवून देणे हे नगराध्यक्ष म्हणून जर तुमच्याकडून होत असेल तर यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे काम नाही हे नगराध्यक्षांनी लक्षात घ्यावे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फतच नळ योजना करा
 
 
Guardian Minister Chandrashekhar Bawankule  नगरपालिका व नगरपंचायत प्रशासनाकडे मोठ्या पाणी पुरवठा योजना साकारण्यासाठी आवश्यक असणारे अभियांत्रिकी व इतर कुशल मनुष्यबळ नसल्याने त्यांनी केलेल्या नळयोजनांमध्ये विविध प्रकारच्या तपासणीत आढळून आल्या. लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे हे ध्येय यातून साध्य झाले नाही अशी वस्तुस्थिती स्पष्ट व परखड भाषेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगराध्यक्षांपुढे ही कामे लोककल्याणाच्या दृष्टीने व अधिक परिपूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बर्‍याच नगरपरिषदांनी पाणी पुरवठा योजना स्वत:च्या राबविल्याने त्या यशस्वी ठरल्या नसल्याचे ते म्हणाले.
 
 
नळाला जिथे तोट्या नाहीत तिथे प्राधान्याने तोट्या लावून वाहून जाणार्‍या पाण्याला अटकाव केला पाहिजे. याचबरोबर ज्या भागात पाण्याचा प्रश्न आहे भागात उपलब्ध असलेल्या नळयोजनेला अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी नगराध्यक्षांना केले. ज्या ठिकाणी पाण्याची अत्यल्पता आहे अशा पाणी आरक्षणाचे आपले प्रस्ताव तयार करुन १० दिवसात देण्यास त्यांनी मुख्याधिकार्‍यांना सांगितले.
गावाचा पाणी विकास आराखडा साकार करा
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. ज्या योजना साकारल्या जात आहेत त्याचा जूना असल्याने या योजना पूर्ण करुनही उपयोगी ठरणार नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून कोणत्याही नगरपरिषदेने पाण्याचा आराखडा तयार करताना भविष्यातील २५ वर्षानंतर असलेली स्थिती लक्षात घेतली पाहिजे. असे जर झाले तरच उपलब्ध असलेल्या पाण्याच्या काटेकोर वापरासह केले जाणारे नियोजन अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
प्रत्येक पालिकांचा परिषदेचा होणार सर्व्हे
अनेक पालिकांचे नकाशे हे ब्रिटीशांच्या काळातील आहेत. अलिकडच्या काळात नकाशात अनेक विकासात्मक बदल झाले आहेत. गावाच्या सीमा वाढल्या, नागरी वस्त्या वाढल्या. ज्या प्रमाणात नकाशात नोंदी व्हायला हव्यात तशा नोंदी नसल्याने मूळ विकासाचा आराखडा हा साकारणे आव्हानात्मक आहे. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ नये यासाठी आता पासूनच विहिरी, विंधन विहिरी, खाजगी विहिरी व इतर पर्यायी जलस्त्रोत याबाबत संपूर्ण माहिती घेवून पुढील महिन्यांसाठी नियोजन करुन ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.