नागपूर
Harne Women's Society गोकुळपेठ येथे हर्णे महिला समाजाचा वार्षिक उत्सव ८ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध कवयित्री स्वाती सुरंगळीकर यांनी “दिलखुलास” या एकपात्री कार्यक्रमातून स्वरचित कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.
माफक देहबोली व वाचिक अभिनयातून सादर केलेल्या कवितांना उपस्थित महिलांची उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव स्मिता मिराशी यांनी केले, Harne Women's Society तर अध्यक्ष देवयानी चिटगोपकर यांनी स्वागत व आभार मानले.
सौजन्य:स्वाती मोहरीर,संपर्क मित्र