हिंदू संघटना न्यायालयात

जातीय भेदभावावरून लक्ष्य केल्याचा आरोप

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
न्यू यॉर्क,
Hindu American Foundation अमेरिकेतील जातीय भेदभावावरील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने (एचएएफ) कॅलिफोर्नियाच्या नागरी हक्क नियामक संस्थेविरोधात नवव्या सर्किट अपील न्यायालयात याचिका दाखल करीत जातीय भेदभावाचा आरोप केला. संस्थेने जातीचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हिंदू धर्माशी जोडून भारतीय आणि दक्षिण आशियाई समुदायांना लक्ष्य केल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले.
 

Hindu American Foundation, HAF lawsuit, 
संस्थेचा आरोप आहे की, कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्या दाव्यांमागील मूलभूत मुद्द्यांचा विचार न करताच खटला फेटाळून लावला. हा संपूर्ण वाद कॅलिफोर्निया नागरी हक्क विभागाने सिस्को प्रणाली आणि तिच्या दोन व्यवस्थापकांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीतून उद्भवला आहे. या तक्रारीत जातीय भेदभावाचा आरोप करण्यात आला होता. नागरी हक्क विभागाच्या अहवालात हिंदू धर्म तसेच भारतीय वंशाच्या कर्मचाèयांना जोडण्याचा प्रयत्न केला. एचएएफने आरोप केला की, अहवालात जात या शब्दाचा वारंवार वापर करण्यात आला Hindu American Foundation  आणि भारतीय कर्मचाèयांमध्ये जातीय भेदभाव अस्तित्वात आहे, असा समज निर्माण करण्यात आला. विभागाने नंतर तो वादग्रस्त शब्दप्रयोग काढून टाकला आणि हे प्रकरण असंबद्ध असल्याचे घोषित केले, तरी संस्थेचे म्हणणे आहे की यामुळे मूळ समस्येचे निराकरण होत नाही.