Home delivery gas cylinder सध्या गॅस सिलेंडरची तीव्रता लक्षात घेता अनेक ग्राहक उन्हातान्हामध्ये सिलेंडर मिळविण्याकरिता धावपळ करताना दिसत आहे. त्यामुळे गुरुवारी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, परीविक्षाधिन अधिकारी पवार, तसेच नीरज गॅस एजन्सीला निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये दारव्हेकरांची वितरण व्यवस्थेकडून मानसिक, शारीरीक व आर्थिक लूट केली जात आहे, अशा तोंडी तक्रारी ग्राहक पंचायतकडे येत आहेत.
Home delivery gas cylinder गॅस वितरक ठरावीक ठिकाणी गाडी उभी करून गॅस धारकास रांगेत उभे करतात. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असतो. अशा परिस्थितीत वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. गॅस बुकिंग केल्यानंतर तारखेनुसार गॅस घरपोच पुरवठा करायायला पाहिजे. मात्र तसे प्रत्यक्षात होत नाही. ग्राहकास घरपोच गॅस पुरवठा होईल याची खात्री द्यावी व वितरण व्यवस्थेतील दोष दूर करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष प्रा. राजेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष राजेंद्र चिंतकुटलावार, उपाध्यक्ष श्याम पांडे, सचिव अंबादास धामोरे, रोजगार (ग्राहक) विभागाचे साहेबराव कांबळे उपस्थित होते.