इम्रानच्या बहिणींवर दहशतवादाचा गुन्हा

तुरुंगाबाहेर आंदोलनाचे प्रकरण

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
रावळपिंडी,
Imran Khan पाकिस्तानच्या रावळपिंडीतील आदियाला रोडवर झालेल्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणात पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणींसह 1,400 जणांवर दहशतवाद कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
 

Imran Khan  
पोलिसांचा आरोप आहे की, आंदोलकांनी कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले, दगडफेक केली आणि पोलिसांवर हल्ला केला, ज्यात किमान नऊ पोलिस जखमी झाले. एफआयआरमध्ये हत्येचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणणे यासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना भेटण्यास बंदी घालण्यात आली होती, याविरोधात पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ  पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर आंदोलन केले होते. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या  पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना Imran Khan  ताब्यात घेतले. यामध्ये इम्रान खान यांच्या बहिणी, नूरीन नियाझी आणि उझमा खानम यांचा समावेश होता. याच प्रकरणात पोलिसांनी आता दहशतवाद कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने या कारवाईवर तीव्र टीका केली आहे.