दागिने उद्योगासाठी स्वतंत्र मंत्रालयाचे आश्वासन
जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कार्यशाळा
नागपूर,
India and Jewellery Domestic Council दागिने उद्योगाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र दक्षता समिती स्थापन झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर दक्षता समिती स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्या जाणार आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये सुवर्ण क्लस्टर्सच्या विकासावर भर दिला जाईल.याशिवाय दागिने उद्योगासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणीवर भविष्यात प्रयत्न करण्याचे आश्वासन विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी दिले.
India and Jewellery Domestic Council इंडिया अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे, उपाध्यक्ष अविनाश गुप्ता आणि माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल उपस्थित होते. सर्वांनी सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि भविष्यात महाराष्ट्र व केंद्र सरकारकडून अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील हून अधिक दक्षता समिती सदस्यांनी भाग घेतला. महाराष्ट्र सरकारने सराफांना जारी केलेल्या परिपत्रकाची संपूर्ण माहिती कार्यशाळेत देण्यात आली. सराफा असोसिएशनचे प्रश्न सोडविण्यासाठी दर दोन महिन्यांनी जिल्हास्तरीय बैठका, दर तीन महिन्यांनी राज्यस्तरीय बैठका आणि दर सहा महिन्यांनी मंत्रालयासोबत बैठका, यावर बैठकीत भर देण्यात आला. पोलीस विभागासोबत जिल्हा स्तरावर नियमित समन्वय आयोजित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. सराफांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.