काळीदौलत,
Kali (Dau) Gurudev Seva Mandal Temple पुसद ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील काळीदौलत येथे मार्मिक स्थळावरील विनापरवाना लावण्यात आलेल्या भोग्यांविरोधात पोलिस प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेला स्थानिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. धार्मिक संस्था चालकांनी तसेच नागरिकांनी सर्व भोंगे स्वेच्छेने खाली उतरवले. ही कारवाई शांततेत पार पडली.
Kali (Dau) Gurudev Seva Mandal Temple काळी (दौ) येथील गुरुदेव सेवा मंडळ मंदिरात विनापरवाना लावण्यात आलेले भोंगे निदर्शनास आल्यानंतर पोलिस प्रशासनाने संबंधित पदाधिकाèयांशी संवाद साधला. यावेळी मंदिराच्या पदाधिकाèयांनी सहकार्याची भूमिका घेत सूचनेचे पालन केले. पोलिस प्रशासनाच्या मर्गदर्शनात भोंगे खाली उतरवले. यावेळी पुसद ग्रामीणचे देशमुख व पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील, धार्मिक स्थळांचे पदाधिकारी निवास मोरे, साहेबराव गावंडे, परिक्षित मोरे व गावकरी उपस्थित होते.