अनिल कांबळे
नागपूर,
Kapilnagar police कपिलनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन केल्याच्या प्रकरणात कपिलनगर पाेलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 14 तासांत आराेपीविरुद्ध न्यायालयात दाेषाराेपपत्र (चार्जशीट) दाखल करून आदर्श निर्माण केला. संवेदनशील प्रकरणांतील पाेलिसांच्या गंभीरतेचे हे उदाहरण मानले जात आहे.
मिळालेल्या Kapilnagar police माहितीनुसार, 1 एप्रिल राेजी रात्री सुमारे 8.30 ते 9 वाजता18 वर्षीय तरुणी घरी एकटी हाेती. यावेळी वैभव गणेश ब्रम्हे (वय 26) हा आराेपी तिच्या घराबाहेर आला. कुत्र्याने चावा घेतल्याचा बहाणा करत त्याने अश्लील शिवीगाळ सुरू केली. घरातून काेणी बाहेर न आल्याने आराेपीने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. घरात घुसल्यानंतर आराेपीने तरुणीचा हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन केले. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर तिचे आई-वडील घटनास्थळी पाेहाेचले. मात्र आराेपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर तरुणीच्या Kapilnagar police तक्रारीवरून पाेलिसांनी तत्काळ गुन्हा नाेंदवला. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक नालटे यांनी आराेपीला ताब्यात घेतले. या प्रकरणात ई-साक्ष्य, एफएसएल तपासणी तसेच सीसीटीएनएस प्रणालीतील नाेंदी अशा सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आल्या. आराेपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 14 तासांतच पाेलिसांनी न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर केले. कपिलनगरचे ठाणेदार सतीश आडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. त्यामुळे पीडितेला लवकर न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.