केरोसीन वितरणावर वाद; ६५० वितरक सज्ज

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
नागपूर,
LPG Gas Shortage एलपीजी गॅस टंचाईमुळे केरोसीन वितरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पेट्रोल पंपांमार्फत वितरणाच्या प्रस्तावाला नागपूरमधील केरोसीन वितरकांनी विरोध करत रेशन दुकानदारांमार्फतच वितरण करण्याची मागणी केली आहे.
 
 
chati
 
शहरातील सुमारे ६५० वितरकांनी परवाने नूतनीकरण केले असून ते वितरणासाठी सज्ज आहेत. शासनाने प्रति रेशनकार्ड ३ लिटर केरोसीन देण्याचा निर्णय घेतला असून  LPG Gas Shortage शहरासाठी १०० केएल मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, वितरणाची पद्धत अद्याप निश्चित नसून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सौजन्य: काजल छेटी ,संपर्क मित्र