'मटका किंग’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

17 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Matka King अभय कोरान्ने लिखित आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली मटका किंग या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर 1960 च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या बॉम्बेची कथा रंगवतो, जिथे एक महत्त्वाकांक्षी कापूस व्यापारी ‘मटका’ नावाचे धाडसी जुगार साम्राज्य उभारतो
 

Matka King Marathi serial, Matka King trailer 2026 
मालिकेत विजय वर्मा प्रमुख भूमिकेत असून, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवर हे महत्त्वाचे कलाकार आहेत. तसेच भारत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, Matka King  इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी यांच्याही भूमिका या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ही मालिका 17 एप्रिलपासून भारतासह जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे