अभिनेता मायकल पॅट्रिक यांचे ३५ व्या वर्षी निधन

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
बेलफास्ट,
Michael Patrick passes away लोकप्रिय मालिकेत दमदार भूमिका साकारलेल्या अभिनेता मायकल पॅट्रिक यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले. मायकल गेल्या तीन वर्षांपासून मोटर न्यूरॉन डिसीज या भयंकर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. मायकल यांनी या आजाराशी झुंज देताना चाहत्यांशी सोशल मीडियावर नियमित संवाद साधला होता.२०२३ मध्ये त्यांना हा आजार आढळला होता.
 

Michael Patrick  
मायकल काही दिवसांपासून व्हीलचेअरवर होते. १० दिवसांपूर्वी ते बेलफास्टमधील रुग्णालयात दाखल झाले होते, जिथे त्यांना घशात छिद्र करून श्वास घेण्याची नळी घालण्याची वैद्यकीय प्रक्रिया करण्याची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती न स्वीकारता आनंदाने आणि ठामपणे जगाचा निरोप घेतला. मायकल पॅट्रिक यांनी 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेत काम केले. सहाव्या सीझनमधील 'द ब्रोकन मॅन' भागात त्यांनी रॉयटर या जंगली माणसाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्यांना व्यापक ओळख मिळाली.