वॉशिंग्टन,
Middle East conflict मध्य-पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या 40 दिवसांच्या युद्धामुळे पश्चिम आशियात प्रचंड विध्वंस झाला आहे. युद्धाच्या काळात सुमारे 43,000 क्षेपणास्त्रे, ड्रोन्स आणि बॉम्बहल्ले झाले, ज्यात 8,710 लोकांचा मृत्यू झाला आणि 40,000 हून अधिक लोक जखमी झाले, तर 40 लाख कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आली.
मध्यपूर्वेतील संघर्षाचा Middle East conflict परिणाम 17 देशांवर झाला असून, एकूण जागतिक आर्थिक नुकसान अंदाजे 40 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे अहवालात नमूद आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था दबावाखाली आहेत, विशेषतः चीन, जपान आणि दक्षिण कोरिया, आणि मंदीची चिन्हे दिसत आहेत. प्रभावित अर्थव्यवस्थांना सावरण्यासाठी एक ते दोन वर्षे, तर पुनर्बांधणीसाठी 20 ते 30 वर्षे लागू शकतात. संघर्षविरामानंतर इराणकडे अजूनही किती क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे याची माहिती समोर आलेली नाही. एका अंदाजानुसार त्यांच्या 20 टक्के प्रक्षेपक यंत्रणा अजूनही कार्यरत असू शकते. इराणची युद्धनीती केवळ त्यांच्या शस्त्रांचे संरक्षण करत नाही, तर भविष्यात दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाच्या परिस्थितीत त्यांना सामरिक फायदाही मिळवून देऊ शकते. शांततेची आशा असली तरी, कायमस्वरूपी तोडगा अजूनही हाती लागलेला नाही.
इराणची अर्थव्यवस्था खिळखिळी
युद्धाचा सर्वात मोठा फटका Middle East conflict इराणला बसला आहे. तेथील पायाभूत सुविधा नष्ट झाल्या, अनेक शिक्षक आणि कलाकार आता ऑनलाइन वर्ग घेऊ शकत नाहीत. युद्धाने केवळ इमारतीच उद्ध्वस्त झाल्या नाही, तर दैनंदिन जीवनही विस्कळीत केले आहे. इराणला 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जीडीपीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे. पर्यावरणाची हानी आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीमुळे अंदाजे 4 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली ढकलले जाऊ शकतात.
अमेरिकेलाही मोठे नुकसान
युद्धाची अमेरिकेलाही मोठी किंमत मोजावी लागली आहे. अहवालानुसार, त्यांचे 15 सैनिक मारले गेले, तर 300 हून अधिक जखमी आहे. आखाती देशातील अमेरिकेचे अनेक तळ आणि विमानांचे नुकसान झाले आहे. स्वस्त इराणी ड्रोन रोखण्यासाठी अमेरिकेने महागडी प्रणाली वापरली यामुळे आर्थिक भार वाढला. अमेरिकेचे चार लढाऊ विमाने नष्ट झाली. जगातील सर्वात महागडे विमान-35ची किंमत 7,6609,100 कोटी आणि एमक्यू-9 रीपर (एक ड्रोन) ची किंमत 2002,500 कोटी आहे.