रामटेक (नागपूर)
Mobile Forensic Van नागपूर जिल्ह्यातील रामटेक उपविभागाला मोबाईल फॉरेन्सिक वॅन मिळाल्याने गुन्हे तपासाला गती मिळणार आहे. घटनास्थळीच पुरावे संकलन व प्राथमिक विश्लेषण करणे शक्य होणार असून तपास अधिक अचूक होईल.या सुविधेमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मोबाईल फॉरेन्सिक वॅनचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम, तसेच मोबाईल फॉरेन्सिक टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.Mobile Forensic Van रामटेक उपविभागासाठी ही सुविधा म्हणजे गुन्हे तपासात एक मोठी क्रांती ठरणार आहे.रामटेक, अरोली, देवलापार व पारशिवनी पोलीस ठाण्यांना याचा फायदा होणार आहे. वॅनमध्ये फिंगरप्रिंट व डिजिटल तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत.
सौजन्य : काजल छेती,संपर्क मित्र