अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
आरोपीस पोस्कोखाली अटक
 
हिंगणघाट, 
Molestation of a girl येथील वीरभगत वॉर्डातील सरफराज शेख बशीर शेख (२८) या युवकाने शेजारी राहणार्‍या व घरगुती संबंधाचा फायदा घेऊन १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. त्याच्या तक्रारीवरून सरफराज शेख याला ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी आरोपी शेजारी घर आहे.
 
 
girkdlsl
 
Molestation of a girl  या युवतीचे व आरोपीच्या घरच्याचे अनेक वर्षापासून कौटुंबिक संबंध होते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने २०२५ पासून अनेकदा अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या संदर्भात मुलाच्या वडिलांना सांगूनही आरोपी सर्फराज याच्या वृत्तीत फरक पडला नाही. उलट तो नेहमीच तिच्याशी गैरवर्तणूक करीत होता. अखेर नाईलाजाने मुलीच्या आई वडिलांनी युवकाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली. त्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.