एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका

४ तरुणांची उपजिल्हाधिकारी पदावर वर्णी

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
सोलापूर
Solapur MPSC toppers महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) २०२४ चा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याने राज्यभरात आपली ताकद दाखवत जोरदार कामगिरी केली आहे. उपजिल्हाधिकारी पदाच्या एकूण सात जागांपैकी तब्बल चार जागा सोलापूरच्या उमेदवारांनी जिंकून जिल्ह्याचा मान वाढवला आहे.
 

MPSC 2024 results, Solapur MPSC toppers, Sub-Divisional Officer Solapur, 
यातील उल्लेखनीय कामगिरी महिलांच्या वर्गात झाली आहे. सुरैया देसाई या उमेदवाराने घर आणि संसार सांभाळत आपल्या स्वप्नाला वास्तव रूप दिले. याशिवाय विजय लामकाने यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सोलापूरसाठी अभिमानाचा क्षण निर्माण केला आहे. मुलींमध्ये आरती जाधव हिने अव्वल स्थान मिळवून जिल्ह्याचा झेंडा उंचावला. पुरुष उमेदवारांमध्ये सोलापूर शहरातील पवन नागनाथ मंगरुळे आणि करमाळा तालुक्यातील सालसे येथील अमित गोकुळ लोकारे यांनी उपजिल्हाधिकारी पदावर यश संपादन केले आहे.
 
 
एमपीएससीच्या इतर Solapur MPSC toppers  विविध पदांवरही सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सांगोला शहरातील डॉ. हिमालय घोरपडे आणि धायटी येथील रविकांत चंद्रकांत पाटील यांनी सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड मिळवली आहे. अकलूज येथील समर्थ संजय राकले आणि सायली शिवाजी परांडे यांनीही सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर यश मिळवले आहे. फोन्डशिरस येथील काजल बेबी भोसले शिक्षण व आदिवासी विभागातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली आहे.मांडकी येथील सागर केशव रणनवरे यांची सहाय्यक संचालक (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा) पदावर निवड झाली आहे. सोलापूर शहरातील प्रज्ञा चौधरी यांनी मुख्याधिकारी पद पटकावले आहे, तर सुर्डी येथील अक्षय ईश्वर काळे गटविकास अधिकारी पदावर यशस्वी झाले आहेत. फळवणी येथील नितीन किसन आसबे यांनी सहाय्यक राज्यकर आयुक्त पद मिळवले आहे. तसेच, गिरवी येथील दिपाली शिवाजी खरात हिने NT-C महिला प्रवर्गातून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.पोलीस उपअधीक्षक पदावर माळशिरसचे प्रदीप गोरड आणि बार्शी तालुक्यातील सतिश भराटे यांनी सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर निवड मिळवून जिल्ह्याचा मान वाढवला आहे. सोलापूर जिल्ह्याची ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या मेहनत, चिकाटी आणि अभ्यासाचे स्पष्ट प्रतीक ठरली आहे.सोलापूर जिल्ह्याचे अधिकारी आणि नागरिक या यशामुळे अभिमानित आहेत आणि भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे राज्यस्तरीय परीक्षांमध्ये आपले नाव रोशन करावे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.