म्हाडाच्या क्रिकेट मैदानात हत्या

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
पोलिसांचा तपास सुरू
 
अमरावती, 
Murder at MHADA cricket ground साईनगरला लागून असलेल्या म्हाडा वसाहतीजवळील क्रिकेटच्या मैदानात एकाची हत्या झाल्याचे आज सांयकाळी समोर आले. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. किरण पुणतांबेकर (४५, रा. साईनगर) असे मृतकाचे नाव आहे. त्याची कोणी केली, कशासाठी केली हे अद्याप समोर आलेले नाही.
 
 
mur
 
Murder at MHADA cricket ground  मैदानातून जाणार्‍या काही नगारिकांना मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेच खोलापुरी गेट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी धाव घेतल्यावर सदर व्यक्तीची हत्या झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ओळख पटविण्याचे काम सुरू केले. काहीवेळाने मृतकाची ओळख किरण पुणतांबेकर या नावाने पटली. बेदम मारहाणीत किरण यांची हत्या झाल्याचा संशय आहे. कारण, त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात मारहाणीचे व्रण दिसत आहे. शवविच्छेदन अहवलानंतरच नेमके कारण समोर येईल. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मारेकर्‍यांना शोध्यण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. ही हत्या नेमकी कशासाठी आणि कोणी केली, या शोध लावल्या जात आहे.