स्वतःच्या खात्यात पैसे घेऊन कंपनीकडे राेख भरल्याचा दावा

फसवणूक प्रकरणातून आराेपीला जामीन

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur fraud case ग्राहकांना सूट देणे हे कंपनीचे धाेरण असून स्वतःच्या खात्यात पैसे घेऊन राेख रक्कम कंपनीच्या खात्यात भरल्यामुळे काेणतीही फसवणूक केली नाही, असा दावा आराेपीने स्वतःच्या बचावासाठी केला. न्यायालयाने या दाव्याला लक्षात घेता आराेपीला जामीन मंजूर केला. चेतन दामाेदर तरारे (निर्मल ग्लाेरी अपार्टमेंट, भिलगाव) असे जामीन मिळालेल्या आराेपीचे नाव आहे.
 

Nagpur fraud case  
ऑटाेमाेटिव्ह चाैकात ऑटाेमाेटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रा.लि. ही कंपनी आहे. तेथे सुशील रमेशराव भाेले (40, सन्मार्गनगर, हुडकेश्वर मार्ग) व चेतन दामाेदर तरारे (निर्मल ग्लाेरी अपार्टमेंट, भिलगाव) हे दाेघे कर्माचारी म्हणून कार्यरत हाेते. 1 एप्रिल 2024 ते 7 जुलै 2025 या कालावधीत त्यांनी काही ग्राहकांना खाेटी बिले दिली व त्यांच्याकडून मिळालेले ऑनलाइन पेमेंट स्वतःच्या खात्यात वळते केले. तसेच काही ग्राहकांना 100 टक्के सूट दिल्याचे दाखविले, असे करत त्यांनी कंपनीला 74.70 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार समाेर आल्यानंतर कंपनीचे अध्यक्ष राजेश मृत्युंजय मिश्रा (57) यांच्या तक्रारीवरून दाेन्ही आराेपींविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी चेतन तरारे याच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र साहू, अ‍ॅड. गुरप्रीतसिंग चंडाेक,अ‍ॅड.प्रुल माेहाेड, अ‍ॅड. गाैरव साहू यांनी Nagpur fraud case  बाजू मांडली. ग्राहकांना सूट देणे हे कंपनीचे धाेरण हाेते. तर कंपनीच्या बँक खात्याचे सर्वर डाऊन असल्याने ग्राहकाकडून स्वतःच्या खात्यात पैसे घेतले. ते पैसे काही दिवसानंतर कंपनीकडे राेख स्वरुपात भरण्यात आले. तसेच बील बनविण्याचे काम अकाऊंटंट करतात. त्यामुळे ही फसवणूक झालीच नसल्याचा दावा अ‍ॅड. शाहू यांनी केला. त्यामुळे न्यायालयाने आराेपी तरारे याला जामीन मंजूर केला.