नागपुरातील 33 पाेलिस हवालदार झाले पाेलिस उपनिरीक्षक

पदाेन्नतीने नव्या नियुक्तीसाठी झाले कार्यमुक्त

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur police promotions 2026 राज्य पाेलिस दलातील पाेलिस उपनिरीक्षक पदाेन्नतीसाठी पात्र असलेल्या 403 पाेलिस हवालदारांना गृहमंत्रालयाच्या सकारात्मक धाेरणामुळे पदाेन्नती देण्यात आली. त्यामध्ये नागपूर पाेलिस आयुक्तालयातील 33 पाेलिस हवालदारांचा समावेश हाेता. आज गुरुवारी सकाळी पाेलिस आयुक्तालयातून पदाेन्नतीने नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू हाेण्यासाठी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले.
 

nagpur police
 
गेल्या 2013 पासून हे सर्व पाेलिस हवालदार पाेलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र हाेते. मात्र, आस्थापना विभाग आणि पाेलिस महासंचालय कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे पाेलिस हवालदारांची पदाेन्नती रखडली हाेती. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे गेल्या 2 एप्रिल राेजी राज्यातील 403 पाेलिस हवालदारांना पाेलिस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली. यामध्ये नागपूर पाेलिस आयुक्तालयातील 33 पाेलिस हवालदारांना पदाेन्नती देण्यात आली आहे. आज गुरुवारी 33 पाेलिस हवालदार यांना पदाेन्नती मिळाल्यामुळे मूळ आस्थापनेवरुन आणि पूर्वीच्या पदावरुन नव्याने नियुक्ती झालेल्या ठिकाणी रुजू हाेण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. आज पाेलिस अधिकाèयांच्या वर्दीत नव्या पाेलिस उपनिरीक्षकांनी शहरातील नियुक्तीच्या ठिकाणी पदभार स्विकारला आहे.
 
यांना मिळाली पदाेन्नती
 
सुभाष तानाेडकर, खेमराज पाटील, छगन शिंगणे, सुनील जाधव, दिनेश झंझाळ, राजेश पाेकळे, दीपक बनसाेड, अविनाश ठाकरे, प्रशांत सवाईथूल, विनाेद कांबळे, संताेष मदनकर, सुनील खानाेरकर, सुनील भीवगडे, प्रशांत देशमुख, विशाल सांगाेडे, अनिल पाटील, नितीन जावळेकर, अंबादास येवले, सुधीर खुबाळकर, वरगंटीवार, रमेश बावनकर, देवेंद्र कुसरे, अरविंद नाईक, श्याम कुळमेथे, चंद्रशेखर घाेडमारे, रवींद्र धरपाळ यांच्यासह 33 जणांचा समावेश आहे.