भरधाव कारच्या धडकेत पती-पत्नी ठार

बेलतरोडी परिसरात भीषण अपघात

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur road accident एका भरधाव कारने दुचाकीने जाणाऱ्या पती-पत्नीस जोरदार धडक दिली या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्ती बाजार परिसरात झाला.
 

Nagpur road accident 2026, Beltarodi accident news 
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक हा बँक मॅनेजर असून तो दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.