आयएमओ परीक्षेत नवयुग शाळेचे ३२ विद्यार्थी सुवर्णपदक विजेते

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Navyug Primary School नवयुग प्राथमिक शाळा (राजबक्ष) येथील इयत्ता १ ते ४ मधील तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड (IMO) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून परिसरात विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
 
785
 
 
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची सखोल तयारी करून घेत आत्मविश्वास वाढवला.Navyug Primary School  विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा प्रशासनाने त्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातही अशाच प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सौजन्य:वर्षा नरसापूरकर,संपर्क मित्र