नागपूर,
Omkarnagar, Nagpur सर्व शाखीय सुवर्णकार महिला मंडळातर्फे चैत्र गौरी पूजनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. ओमकारनगर येथे . शीतल येरपुडे यांच्या निवासस्थानी सुंदर पानाफुलांच्या सजावटीत गौरीची स्थापना करण्यात आली.
नगरसेविका माया हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा, आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी गाणी, भजन तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांनी कार्यक्रमात रंगत आली.Omkarnagar, Nagpur उपस्थित सुवासिनींनी एक मिनिटांचे खेळ खेळून आनंद लुटला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीना पाचकवडे, लता खापेकर, कुमुद गायकवाड, गीतांजली बनकर, अनुपमा हिरुळकर, उमा पाटील, प्रतिभा इनकाने, सुषमा सकाळकर, मनीषा बनकर, अरुणा उजाईणकर, श्रेजल येरपुडे आदींचे सहकार्य लाभले. शेवटी पन्हे व नास्ता वितरणासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य: माया हाडे ,संपर्क मित्र