अनिल कांबळे
नागपूर
police recruitment शहर पाेलिस आयुक्तालय स्तरावर सुरू असलेल्या कारागृह शिपाई भरती प्रक्रियेत काही कारणास्तव उपस्थित न राहू शकलेल्या पुरुष उमेदवारांना प्रशासनाने शेवटची संधी दिली आहे. ज्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ मागितली हाेती किंवा ज्यांची इतर भरती प्रक्रियेमुळे एकाच दिवशी तारीख आली हाेती, अशा उमेदवारांची चाचणी आता 13 एप्रिल राेजी आयाेजित करण्यात आली आहे.
पाेलिस मुख्यालय, पाेलिस लाईन टाकळी, जुना काटाेल नाका चाैक येथे ही चाचणी पार पडणार आहे. संबंधित उमेदवारांनी 13 एप्रिल राेजी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी मैदानावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या तारखेनंतर काेणत्याही उमेदवाराची शारीरिक माेजमाप किंवा मैदानी चाचणी घेतली जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आजारपणामुळे मुदतवाढ मागितली हाेती, त्यांनी शासकीय वैद्यकीय अधिकाèयाचे मैदानी चाचणीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र साेबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या कारणाची सत्यता पडताळली जाईल. इतर काेणत्याही घटकात भरतीसाठी हजर असल्याचा लेखी police recruitment पुरावा सादर केल्यावरच चाचणीची संधी दिली जाईल. उमेदवारांनी या घटकाचे तसेच इतर घटकांचेही प्रवेशपत्र साेबत बाळगणे आवश्यक आहे. अप्पर पाेलिस आयुक्त (गुन्हे) तथा कारागृह शिपाई भरतीचे अध्यक्ष वसंत परदेशी यांनी ही माहिती दिली असून, उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.