गोंदिया जिल्ह्यातील रस्ते व राष्ट्रीय महामार्ग टाकणार कात!

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
- राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नांवर खा. प्रफुल पटेल यांची नागपूर येथे अधिकाऱ्यांशी बैठक
- उडान पुलाचे काम व नवीन मार्गिका काढण्याबाबत दिले निर्देश

गोंदिया, 
Praful Patel खा. प्रफुल्ल पटेल हे भंडारा–गोंदिया जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना त्यांनी पक्ष कार्यकर्ते व नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध सूचना आणि राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित समस्यांची गांभीर्याने दखल घेतली. या अनुषंगाने त्यांनी बुधवारी ८ एप्रिल रोजी नागपूर येथे नॅशनल हायवेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील विविध रस्ते कात टाकणार असून राष्ट्रीय महामार्ग च्या समस्याही सुटणार आहेत तर जिल्ह्यातील विविध उडान फुलांचे प्रलंबित करणे पूर्ण होणार असताना नवीन मार्गिका तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
patel
 
 
Praful Patel  खा. पटेल भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी येथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत विविध समस्या जाणून घेतल्या तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान नागपूर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विविध महत्त्वाच्या कामांवर चर्चा केली. यामध्ये कोहमारा ते गोंदिया रस्त्याचे चारपदरी कॉंक्रीटीकरण करणे, गोंदिया–तिरोडा मार्गावरील काचेवानीजवळील उड्डाणपूल तातडीने पूर्ण करणे, तसेच गोंदिया शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भागवतटोला ढाकणी– नंगपुरा मूरी – पिंडकेपार कोहमारा नवीन मार्गिका काढणे, याशिवाय रावणवाडी – कामठा – आमगाव – कोहमारा या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ शी जोडणाऱ्या बाह्य वळण मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी सारस चौक ते फुलचूर नाका या रस्त्याचे बांधकाम व विद्युतीकरण लवकर पूर्ण करणे, तसेच बालाघाट टी-पॉईंट, मरारटोली–तिरोडा रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलांच्या प्रस्तावित कामांच्या त्रुटी दूर करून गती देण्यावर भर देण्यात आले. वरील सर्व प्रलंबित कामांमधील त्रुटी दूर करून तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना खा. पटेल यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.